Anirudha Sankpal
दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया आणि लाईव्ह कल्चर असल्याने ते पोटातील 'गट मायक्रोबायोम'ला मजबूत करते.
दहीभात मऊ आणि सहजरीत्या पचणारा असल्याने पोट बिघडलेले असताना किंवा भूक कमी असताना उत्तम आहार ठरतो.
शिजवून थंड केलेला भात स्टार्च रेझिस्टंट बनतो, ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढत नाही आणि चांगल्या जिवाणूंना पोषण मिळते.
ॲसिडिटी होत असल्यास आणि गोळी घेणे टाळायचे असल्यास दहीभात पोटाला त्वरित आराम देतो.
दुधाची ॲलर्जी आहे, ज्यांना दहीभात खाणे टाळावे. दही खाल्ल्यानंतर ज्यांना पोट फुगणे (Bloating) किंवा गॅसचा त्रास होतो, त्यांनीदेखील दहीभात टाळणे उत्तम.
डायबिटीस असणाऱ्यांनी किंवा वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी दहीभातातील भाताचे प्रमाण (Portion Size) मर्यादित ठेवावे.
दहीभात ही पोटाच्या आजारांवरची पूर्ण वैद्यकीय ट्रीटमेंट नसली, तरी पोटाला आराम देणारा एक प्रभावी आणि सोपा घरगुती उपाय आहे.