Anirudha Sankpal
दिवसभरात आपल्यासोबत अनेक अशा विचित्र गोष्टी घडत असतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
मात्र याच गोष्टी साधा थकवा म्हणून सोडून देऊ नका. तुम्ही सतत तणावात असल्यामुळं देखील या समस्या येत असतील.
जर तुमचा डोळा सतत फडफडत असेल तर याचे एक कारण तणाव देखील असू शकतो. थकवा, जास्त कॅफीन आणि डोळ्यांवरचा अती ताणासोबत स्ट्रेसमुळे देखील डोळे फडफडू शकतात.
मानसिक आणि शारीरिक तणाव हा केसांच्या वाढीच्या सायकलला प्रभावित करू शकतो. त्यामुळं काही काळानंतर जास्त केस गळती दिसू शकते. याला दुसरी देखील कारणं असू शकता.
तुम्ही एखादं काम करत असताना अचानक तुम्ही गोष्टी विसरून जाता किंवा ब्रेन फॉग होतो. फोकस करायला त्रास होतो. दीर्घकाळ तणावत असाल तर फोकस आणि मेमरी याच्यावर परिणाम होतो.
स्ट्रेसमध्ये असाल तर अचानक कारण नसताना तुम्हाला जास्त उष्णता किंवा थंडी जाणवू शकते. तणावात शरीराचा अलर्ट सिस्टम अॅक्टिव्ह होतो. ह्रदयाचे ठोके वाढतात श्वास घेण्याची पद्धत बदलते.
तणावाचा परिणाम फक्त मेंदूवर होत नाही तर पोटावर देखील होतो. सतत तणावात राहिल्यानं पोट जड होणे, ब्लोटिंग, अपचन, गॅस पित्त वाढणे अशा समस्या होऊ शकतात.
तणाव किंवा एन्झायटीवेली शरीरात असे बदल होतात की तुमच्या छातीत दुखते किंवा जडपणा येतो. मात्र छातीचं दुखणं तणाव म्हणून सोडून देऊ नये. यामागे ह्रदयाच्या दुसऱ्या देखील समस्या असू शकतात.