Shikakai benefits: फक्त केसांसाठीच नाही; शिकेकाईचे 'हे' आहेत ७ अद्भूत आयुर्वेदीक फायदे

पुढारी वृत्तसेवा

लालसर मातट रंगाच्या शेंगा आणि त्यांची पावडर सर्वांना माहीत आहेच. त्याचे विविध आरोग्यदायी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत:

पोटातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी: १० ग्रॅम शिकेकाईचा अर्धा लीटर पाण्यात अष्टमांश (१/८ भाग उरेपर्यंत) काढा तयार करावा.

हा काढा घेतल्याने पोट साफ होऊन विषारी घटक बाहेर पडतात. (यामुळे कफ देखील बाहेर पडतो, सूज उतरते आणि पोटाचा फुगारा/गुबारा कमी होतो.)

दातदुखीवर: शिकेकाईचा काढा करून त्याने वारंवार गुळण्या कराव्या.

Teeth

काविळीवर: शिकेकाईचा काढा सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा. पथ्य: जेवणात फक्त दहीभात खावा.

कफ पातळ होण्यासाठी: शिकेकाईच्या शेंगा पाण्यात उकळवून, ते पाणी गाळून घेऊन थोडे थोडे पिण्यास द्यावे.

Winter Cold Home tips | file photo

विंचूदंशावर: खाण्याच्या (नागवेलीच्या) पानात शिकेकाईचा लहान तुकडा ठेवून तो चावून खाण्यास द्यावा.

गुरांना विषबाधा झाल्यास: शिकेकाईची टरफले बियांसह बादलीभर ताकात वाटून (मिक्स करून) ते ताक गुरांना पिण्यास द्यावे.

केसवाढीसाठी (केसवर्धनासाठी): शिकेकाई पावडरने आठवड्यातून किमान एकदा तरी केस धुवावे (न्हावे). यामुळे केस मोकळे आणि मऊ राहतात, केसांच्या मुळांना मसाज होऊन रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची उत्तम वाढ होते.