पुढारी वृत्तसेवा
नैसर्गिक थंडावा
उन्हाळ्याच्या कडक उन्हात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी काकडी, पुदिना आणि लिंबू यांचे मिश्रण अत्यंत गुणकारी आहे.
झटपट हायड्रेशन
हे डिटॉक्स ड्रिंक केवळ तहान भागवत नाही, तर शरीरातील पाण्याची पातळी (Electrolytes) झपाट्याने संतुलित करते.
विषारी घटक बाहेर काढा
लिंबू आणि पुदिना शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर फेकून लिव्हर आणि किडनी स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
पचनशक्ती वाढवा
पुदिना पोटाला शांत करतो, तर काकडीतील फायबर पचनक्रिया सुधारून गॅस आणि ॲसिडिटी कमी करतात.
चमकदार त्वचा
या पेयातील व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि मुरुमांच्या समस्या कमी होतात.
वजन कमी करण्यास उपयुक्त
हे झिरो कॅलरी ड्रिंक मेटाबॉलिझम वाढवते, ज्यामुळे अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते.
असे बनवा ड्रिंक
एका जॅरमध्ये पाण्याच्या स्लाईस, पुदिना पाने आणि लिंबाचे काप घालून रात्रभर किंवा ३-४ तास फ्रीजमध्ये ठेवा.