पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्याच्या कडक दिवसांत, माठातील पाण्याचा एक ग्लास फ्रिजमधील थंड पाण्यापेक्षा अधिक आरोग्यदायी आहे
माठातील पाण्याची नैसर्गिक थंडावा देणारी गुणवत्ता आणि आरोग्यादृष्ट्या महत्त्व आजही कायम आहे. मात्र, त्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास धोकादायक ठरू शकते
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, पाणी साठवणूक करताना चुकीची हाताळणी, अस्वच्छता आणि घाणेरडी भांडी यामुळे पाणी दूषित होऊ शकते
माठ न धुता पुन्हा पाणी भरल्याने आत थर साचतात. घाणेरड्या हातांनी किंवा वापरलेल्या कपाने पाणी काढल्यास पाण्यात अशुद्धता मिसळते
माठ उघडा ठेवणे किंवा सैल झाकण ठेवल्याने धूळ, कीटक आणि इतर कण पाण्यात जातात, दीर्घकाळ पाणी न बदलल्यास बॅक्टेरिया वाढू शकतात
माठातील छिद्रे जरी पाणी थंड ठेवण्यास मदत करत असली तरी त्यात ओलावा साठू शकतो, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढण्यास पोषक वातावरण तयार होते
माठ नीट स्वच्छ केला नाही, तर आतल्या बाजूला थर साचतो, त्यामुळे विशेषतः उष्ण हवामानात बॅक्टेरिया अधिक वेगाने वाढतात
माठ योग्य प्रकारे झाकून ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे बाहेरील दूषित घटक आत येत नाहीत. पाणी काढताना काळजी घ्यावी
माठाची देखभाल, स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. साध्या पद्धतीनेही माठ स्वच्छ करण्यासाठी मीठ, बेकिंग सोडा इत्यादींचा वापर करता येतो