Ajwain Leaf Pakoda|घरात ओव्याचे झाड आहे? अशी बनवा कुरकुरीत पाचक 'ओव्याच्या पानांची भजी'

स्वालिया न. शिकलगार

साहित्य:ओव्याची पाने १०-१५, बेसन १ कप, तांदळाचे पीठ २ मोठे चमचे

हळद, लाल तिखट अर्धा छोटा चमचा, हिंग चिमूटभर, आलं-लसूण पेस्ट १ छोटा चमचा

ओवा अर्धा छोटा चमचा, मीठ, पाणी, तळण्यासाठी तेल

कृती: ओव्याची पाने स्वच्छ धुवून घ्या, कापडाने कोरडी करून घ्या

बेसन, तांदूळ पीठ, ओवा, हळद, तिखट, हिंग, आलं-लसूण पेस्ट, मीठ एकत्र करा

त्यात थोडे-थोडे पाणी घालून इडलीच्या पिठापेक्षा थोडेसे घट्टसर बॅटर फेटून घ्या

कढईत मध्यम आचेवर तळण्यासाठी तेल चांगले तापवून घ्या

ओव्याचे एक पान घेऊन ते पिठात चांगले डीप करा, तापलेल्या तेलात सोडा

गॅस मध्यम ठेवून भजी दोन्ही बाजूंनी छान तळून घ्या

गरमागरम कुरकुरीत ओवा पानांची भजी मसाला चहा/टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Copper kalash with Coconut |तांब्याच्या कलशमध्ये पाणी भरून त्यावर नारळ ठेवण्याचे 'हे' खास फायदे