पुढारी वृत्तसेवा
न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ३२३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
या विजयासह न्यूझीलंड संघाने तीन सामन्यांची मालिका २-० अशा फरकाने जिंकली आहे.
या विजयामुळे कसोटी गुणतालिकेतीही न्यूझीलंड संघाची दमदार वाटचाल कायम राहिली आहे.
या मालिकेत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफी याने आपल्या भेदक गोलंदाजीने इतिहास रचला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत डफीने सर्वाधिक २३ बळी घेतले.
मालिकेतील तीन वेळा डावात पाच बळी घेण्याच्याही कामगिरी डफीने आपल्या नावावर केली आहे.
या चमकदार कामगिरीच्या जोरावर डफीने एक मोठा टप्पा ओलांडला असून न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू रिचर्ड हॅडली यांचा ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ८० बळी घेण्याचा विक्रम आतापर्यंत सर रिचर्ड हॅडली यांच्या नावावर होता.
डफीने या वर्षी ८१ विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही गोलंदाजाने घेतलेल्या विकेटपेक्षा त्या सर्वाधिक आहेत.