अंजली राऊत
थंडी वाढत असताना भेडसावणारी समस्या म्हणजे टाचांना भेगा पडणे. किरकोळ भेगा पडणे ठीक आहे परंतु मोठ्या भेगांमुळे असह्य वेदना त्रासदायक ठरतात.
हवामानामुळे टाचांना भेगा पडतात असे मानतात परंतु प्रत्यक्षात, यासोबतच, शरीरात काही जीवनसत्त्वांची कमतरता देखील त्याचे कारण असू शकते.
टाचांना भेगा पडणे ही केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही समस्या आहे. काही विशिष्ट जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होऊन टाचांना भेगा पडतात.
व्हिटॅमिन 'बी 3' (नियासिन), व्हिटॅमिन 'ई' किंवा व्हिटॅमिन 'सी' यांच्या कमतरतेमुळे टाचांना भेगा पडू शकतात. या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे त्वचा पातळ होऊन टाचांना भेगा पडतात.
व्हिटॅमिन 'बी 3', 'ई' आणि 'सी' हे तीन जीवनसत्त्वे त्वचेला पोषण देतात, मऊ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊन टाचांना भेगा पडतात आणि त्वचा कोरडी होते.
व्हॅसलीन, क्रीमच पुरेसे नाही तर आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. तुमच्या आहारात लिंबू, संत्री, स्ट्रॉबेरी, बदाम, बिया, आवोकॅडो आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा
तुमच्या आहारात संपूर्ण धान्य तसेच शेंगदाणे, मसूर आणि ब्राऊन तांदूळ यांचा समावेश करू शकतात. हे सर्व तुमच्या त्वचेला आतून मॉइश्चरायझ करतील, ज्यामुळे भेगा पडलेल्या टाचांपासून मुक्ती मिळेल.
थंडीमध्ये तुमच्या पायांची काळजी घेणे देखील आवश्यक आहे, जसे की पायात सॉक्स घाला, घरात वावरतांना सुद्धा पायात सॉक्स किंवा शक्य असेल तर चप्पल घाला, त्वचेची काळजी घ्या.