Tongue | जिभेवरील टेस्टबडस् चे काय काम? स्वाद बिघडला तर काय असू शकतो संकेत

पुढारी वृत्तसेवा

जिभ म्हणजे आपल्याला टेस्टी स्वादीष्ट खाणे ओळखणे किंवा कोणत्‍याही पदार्थाची चव समजून देणारे अंग नाही तर ती आहे एक शरीराची व मेंदूची कम्युनिकेशन सिस्टम

मनुष्याच्या शरिरातील सर्वात महत्‍वाचे अंग म्हणजे जीभ मेंदूची पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक म्हणजे आपली जीभ हे सर्वात महत्‍वाचे

पण जीभ हे शरीराचे सर्वात मुलभूत अंग आहे शरीरात मुखावाटे कोणता पदार्थ शरीरात जायचा किंवा तो थांबवायचा हे काम फक्त जिभच करु शकते

या जीभेवर असतात सर्वात महत्‍वाचा घटक म्हणजे टेस्ट बडस जीभेवर लहान लहान गोल असा यांचा आकार असतो. मायक्रोस्कोपमध्ये असे दिसतात.

हे टेस्ट बडस् सुक्ष्म पेशींचे समुह असतात यांचे मुख्य काम गोड, खारट, आंबट व कडू हे प्रमुख चार स्वाद ओळखण्याचे

हे बडस जीभेवर कोणताही पदार्थ ठेवल्यानंतर मिलीसेकंदाच्या आत मेंदूपर्यंत हे सिग्नल पाठवण्याचे काम करतात तेही विजेच्या वेगाने

या सिग्नलमुळे आपल्या शरीरात जाणारा पदार्थ कोणत्‍या चवीचा आहे, तो विषारी तर नाही त्‍याने शरिरातील महत्‍वाच्या अंगांना कोणता धोका तर नाही याची तत्‍काळ जाणीव करुन देतात.

मेडीकल सायन्सच्या मतानुसार टेस्ट बडस नेहमी नवीन बनत राहतात. नसा लाळ व तोडांच्या आरोग्याबाबत भाष्य करतात

जर तुमच्या टेस्ट बडस् ची चव बदलू लागली हे संकेत देतात की इन्फेक्शन, नसांची समस्या किंवा कोणत्‍यातरी गंभीर आजाराचा

त्‍यामुळे तुमची जीभ केवळ चव किंवा स्वाद घेण्याचे काम करत नसून ती एक बायोलॉजी प्राटेक्शन व मेंदूपर्यंचे कम्युनिकेशन यांचा ताळमेळ आहे