Mosquito|जगातील ‘हा’ देश आहे सर्वाधिक डास असलेला

Namdev Gharal

डास किंवा मच्छर हा असा किटक आहे जो मानवजातीसाठी घातक आहे. जगभरात कोणत्‍या देशात सर्वाधिक डास व किती प्रजाती आढळतात हे पाहू (क्रमवारी - माहितीच्या आधारे अंदाजे - माहिती सोर्स वेब)

या यादीत चिन हा आपला शेजारी देश दहाव्या क्रमांकावर येतो. याठिकाणी 238 प्रजातीचे डास आढळतात व संख्याही अधिक आहे .

कॉंगो (Democratic Republic of the Congo) हा देश डासांच्या संख्येबाबतीत ९व्या क्रमांकावर येतो . जैवविविधता आणि उष्णकटिबंधीय जंगलामुळे प्रजातींची संख्या अधिक आहे - 248 प्रजाती.

आठव्या स्‍थानी कोलंबिया (Colombia) हा देश येतो या ठिकाणची मोठी जैवविविधता व जंगल क्षेत्र यामुळे मच्छर अधिक असतात. — 251 प्रजाती.

७ व्या क्रमांकावर मध्य अमेरिकेतील पनामा (Panama) हा देश येतो या अमेझॉन जंगल तसेच वर्षावने यामुळे डासांच्या अनेक प्रजातींची संख्या येथे अधिक आहे. - 264 प्रजाती.

सहाव्या स्‍थानी फिलीपीनस (Philippines) हा देश येतो हा देश अनेक द्वीपसमूहांनी बनला आहे त्‍यामुळे तसेच समुद्रकाठी व दमट हवमानामुळे डासांची संख्या जास्‍त आहे. - 294 प्रजाती.

पाचव्या स्‍थानी भारत (India) देश येतो विविध हवामान, भूभाग, जलप्रवाह असल्यामुळे तसेच दाट लोकवस्‍तीमुळे डास मोठ्या प्रमाणात आहेत. -338 प्रजाती

चौथ्‍या स्‍थानी थायलँड (Thailand) उष्णकटिबंधीय हवामानामुळे, जैव विविधतेने समृद्ध देश आहे यामुळे याठिकाणी खूप सारे मच्छर आढळतात. - 379 प्रजाती आढळतात

या यादीत तिसऱ्या स्‍थानी मलेशिया (Malaysia| हा देश येतो. प्रजातींची संख्याही जास्‍त आहे - 415 डासांच्या प्रजाती आढळतात

२ ऱ्या स्‍थानवार इंडोनेशिया (Indonesia) हा देश येथे डासांच्या अनेक प्रजातींचे वैविध्य फार जास्त आहे. अनेक endemic प्रजाती येथे आढळतात - 439 प्रजाती

क्रमांक १ वर ब्राझील (Brazil) देश येताे जगातील सगळ्यात जास्त डासांच्या प्रजाती व संख्या या देशात आढळते; अमेझॉन जंगल व दलदलीचे प्रदेश यामुळे याठिकाणी अतिप्रमाणात डास आढळतात. प्रजाती - 447

Coconut Crab : नारळ सोलणारा खेकडा