Coconut Crab : नारळ सोलणारा खेकडा

Namdev Gharal

हा खेकडा जमिनीवर राहणारा सर्वात मोठा मानला जातो.म्हणजेच कवचधारी खेकड्यांच्या प्रजातीतील सर्वात मोठा प्रकार

विषेश म्‍हणजे हे खेकडे ५० वर्षांहून जास्त काळ जगू शकतात

याची लांबी साधारण १ मीटरपर्यंत (पायांसह) आणि वजन ४ ते ५ किलोपर्यंत असू शकते.

याचे पुढचे नांगे अतिशय मजबूत असतात. ते माणसाच्या पकडीपेक्षा १० पट जास्त ताकदवान असतात.

हिंदी महासागर, प्रशांत महासागरातील बेटे आणि किनारी भाग याठिकाणी हे आढळतात

याचे आकारमान व ताकदीमुळे हा खेकडा सहजपणे नारळ फोडू व सोलू शकतो. त्यामुळेच याला “Coconut Crab” असे नाव मिळाले

नारळ फोडून आतील गर खाणे आणि नारळपाणी हा याचा आवडता आहार आहे

याशिवाय हा खेकडा फळे, पाने, लहान प्राणी, अंडी इत्यादीही खातो.

लहानपणी हे शंखामध्ये राहतात, पण मोठे झाल्यावर ते स्वतःचे कठीण कवचाने संरक्षण करतात.

काही बेटांवर यांना “चोर खेकडा” (Robber Crab) असेही म्हणतात कारण हे माणसांच्या वस्तू उचलून नेतात.