Interesting Facts : देश तोच; पण नाव बदलले!

पुढारी वृत्तसेवा

जगात असे अनेक देश आहेत ज्यांची नावे बदलली आहेत. जाणून घेवूया अशा देशांविषयी...

श्रीलंका या देशाला पूर्वी सिलोन म्हटले जायचे; परंतु १९७२ नंतर हे नाव बदलण्यात आले.

इराणला पूर्वी पर्शिया म्हणून ओळखले जात असे; परंतु १९३५ मध्ये देशाने अधिकृतपणे त्याचे नाव बदलून इराण केले.

१९९३ पूर्वी कंबोडिया या देशाला कंपुचिया म्हटले जायचे.

तुर्कीए देशाला पूर्वी 'तुर्की' म्हटले जायचे, परंतु या देशाने २०२२ साली आपले नाव बदलण्याची घोषणा करून ते 'तुर्कीए' असे केले.

म्यानमारला पूर्वी बर्मा म्हटले जायचे. १९८९ मध्ये लष्करी नेत्यांनी लोकशाही समर्थक उठाव दडपून टाकत देशाचे नामांतर केले.

२०१६ पर्यंत चेकिया या देशाला चेक प्रजासत्ताक म्हटले जात असे.

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो हा देश पूर्वी झैरे म्हणून ओळखले जात असे.

नेदरलँड्स देखील त्याचे नाव बदललेल्या देशांपैकी एक आहे. पूर्वी ते हॉलंड म्हणून ओळखले जात असे.

येथे क्‍लिक करा.