Namdev Gharal
कानाच्या मळाला शास्त्रीय भाषेत 'सेरुमेन' (Cerumen) असे म्हणतात. अनेकांना हा मळ म्हणजे घाण वाटते आणि तो सतत काढण्याची इच्छा होते.
पण तुम्हाला हे माहिती आहे का कानातील मळ म्हणजे कानांच्या संरक्षणसाठी निसर्गाने केलेली व्यवस्था असते
मुळात मळ तयार कसा होतो : कानाच्या बाह्य मार्गामध्ये Ear Canal 'सेरुमिनस ग्लँड्स' असतात या ग्लँडसवर तेल, घाम, त्वचेच्या मृत पेशी आणि कानातील केसांचा थर साचतो तो म्हणजेच मळ
हा मळ कानासाठी 'नैसर्गिक संरक्षक' म्हणून कार्य करतो कानाच्या पडद्यापदर्यंत धूळ, कचरा आणि बाह्य जंतूं पोहोचू न देणे हे याचे मुख्य काम आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे : मळामध्ये अम्लीय (Acidic) गुणधर्म असतात, जे कानात बॅक्टेरिया किंवा बुरशी (Fungus) वाढू देत नाहीत.
तसेच हा मळ कानाच्या आतील त्वचेला ओलावा देतो, ज्यामुळे कानात खाज येत नाही किंवा त्वचा कोरडी पडत नाही.
मळ काढणे योग्य की अयोग्य? या प्रश्नाचे उत्तरांवर मतमतांतरे आहेत. पण बहुतेक डॉक्टर कानातील मळ स्वतःहून काढण्यास अयोग्य मानतात.
कारण आपला कान स्वतःची स्वच्छता स्वतःच करतो. जेव्हा आपण बोलतो किंवा जेवण चघळतो, तेव्हा जबड्याच्या हालचालीमुळे जुना मळ हळूहळू बाहेरच्या दिशेने ढकलला जातो आणि आंघोळीवेळी तो आपोआप निघून जातो.
कान स्वच्छ करण्यासाठी आपण इअरबडस् वापरतो, तेव्हा मळ बाहेर येण्याऐवजी तो अधिक आतमध्ये ढकलला जातो. यामुळे कानाचा पडदा फाटण्याची किंवा कायमचे बहिरेपण येण्याची भीती असते.
जर तुम्हाला कानात मळ साचल्यामुळे, कान दुखणे किंवा कान गच्च होणे, ऐकायला कमी येणे, कानातून विचित्र आवाज असे त्रास होत असतील तर ते काढलेला चांगला
यासाठी टोकदार वस्तू, काडी किंवा पिना वापरू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने 'इअर ड्रॉप्स' वापरावेत, ज्यामुळे मळ मऊ होऊन बाहेर पडतो.
जास्त त्रास असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून (ENT Specialist) कान स्वच्छ करून घ्यावेत.तसेच इअर बड्सचा वापर फक्त कानाच्या बाहेरील वळणांसाठी करणे चांगले.