Coriander storage tips: कोथिंबीर दोन दिवसांत खराब होते? ‘ही’ ट्रिक करून पाहा, आठवडाभर राहील ताजी, टवटवीत

पुढारी वृत्तसेवा

कोथिंबीर दोन दिवसांत काळी पडते का?

फ्रिजमध्ये ठेवूनही कोथिंबीर लवकर खराब होत असेल, तर साठवण्याची पद्धत बदलून पाहा.

सर्वप्रथम खराब पाने काढा

कोथिंबीर घरी आणल्यानंतर पिवळी, काळी किंवा खराब झालेली पाने आणि देठ वेगळे करा.

कोथिंबीर लगेच धुवू नका

वापरण्यापूर्वीच धुतल्यास त्यावर अतिरिक्त ओलावा राहून ती लवकर खराब होण्याची शक्यता कमी होते.

कागदी टिश्यू ठरेल उपयोगी

कोथिंबीर हलक्या हाताने कोरड्या टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा, त्यामुळे अतिरिक्त ओलावा शोषला जाईल.

आता हवाबंद डब्यात ठेवा

टिश्यूमध्ये गुंडाळलेली कोथिंबीर स्वच्छ, कोरड्या डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवा.

दर दोन-तीन दिवसांनी तपासा

डब्यात ओलावा साचला असल्यास टिश्यू पेपर बदला आणि खराब झालेली पाने लगेच काढून टाका.

देठ पाण्यात ठेवण्याची ट्रिकही वापरा

कोथिंबिरीचे देठ थोड्या पाण्यात ठेवून वरून सैल प्लास्टिक पिशवी झाकल्यानेही ती ताजी ठेवण्यास मदत होऊ शकते.

मग कोथिंबीर राहील ताजी आणि टवटवीत

योग्य प्रकारे साठवणूक केल्यास कोथिंबीर साधारण आठवडाभर ताजी ठेवण्यास मदत होऊ शकते.

येथे क्लिक करा...