Constipation Home Remedies|सकाळी तासनतास टॉयलेटमध्ये बसूनही पोट साफ नाही? 'हे' उपाय नक्की करा

पुढारी वृत्तसेवा

अयोग्य आहार, पाण्याचे कमी प्रमाण, शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव ही कारणे आहेत

सकाळी उपाशी पोटी २ ग्लास कोमट पाणी प्या. आतड्यांची हालचाल होईल

रात्री ५-६ काळे मनुके, २ वाळलेले अंजीर पाण्यात भिजत ठेवून ते सकाळी खा

यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने नैसर्गिक रेचक (laxative) म्हणून काम करते.

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात १ चमचा शुद्ध गाईचे तूप मिसळून प्या.

यामुळे आंतड्यांमधील कोरडेपणा कमी होऊन सकाळी शौचास साफ होते.

रात्री झोपताना १ चमचा इसबगोल/अळशीची पूड कोमट पाण्यातून डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.

जेवणात हिरव्या पालेभाज्या, सॅलड, पेरू, सफरचंद, पपई, कोंडा असलेल्या धान्य खा

दिवसभरात किमान ३ लिटर पाणी प्या. ताक, लिंबू पाणी, शहाळेही घेऊ शकता

दररोज सकाळी टॉयलेटला जाण्याची सवय लावा. सकाळचे हलके व्यायाम करा

टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणे किंवा जास्त वेळ ताण देऊन बसणे टाळा

'स्क्वॉटिंग पोजिशन' (भारतीय पद्धतीचे टॉयलेट) वापरा

Champa flower fragrance | चाफ्याला तीव्र, धुंद करणारा सुगंध नेमका कुठून येतो? जाणून घ्या या फुलामागचं गुपित