पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्यात आइस्ड टी किंवा थंड चहा शरीराला थंडावा देतो आणि थकवा कमी करण्यास मदत करतो.
चहामधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक घटक कमी करण्यास मदत करतात आणि प्रतिकारशक्ती सुधारतात.
ताजा तयार केलेला थंड चहा आरोग्यासाठी सुरक्षित असते, तर जास्त वेळ ठेवलेला चहा पोटासाठी त्रासदायक ठरू शकते.
खुप वेळाचा किंवा योग्यरीत्या साठवला नसलेला थंड चहा पिल्यास जुलाब, गॅस किंवा पोटदुखी होऊ शकते.
थंड चहामध्ये जास्त साखर घातल्यास वजन वाढण्याचा धोका वाढतो आणि मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो.
थंड चहा जास्त प्रमाणात पिल्यास पचनक्रिया मंदावू शकते, विशेषतः संवेदनशील पोट असलेल्या लोकांमध्ये.
साखर आणि फ्लेवर्ड सिरप असलेला थंड चहा नियमित पिल्यास लठ्ठपणाचा धोका वाढतो.
अॅसिडिटी, गॅस किंवा पोटाचे विकार असलेल्या लोकांनी थंड चहा मर्यादित प्रमाणात घ्यावा.
घरच्या घरी तयार केलेली, कमी साखर असलेली आणि ताजी थंड चहा आरोग्यासाठी अधिक चांगली ठरते.