Rahul Shelke
हिवाळा म्हणजे थंडी, सर्दी-खोकला आणि बदललेला आहार. याच काळात अनेकांना प्रश्न पडतो हिवाळ्यात नारळ पाणी प्यावं की नाही?
बहुतेक लोक नारळ पाणी हे फक्त उन्हाळ्यातील ड्रिंक मानतात. म्हणूनच 90% लोक हिवाळ्यात ते नारळपाणी घेत नाहीत.
तज्ज्ञ आणि आयुर्वेद सांगतं, योग्य वेळी प्यायल्यास नारळ पाणी हिवाळ्यातही फायदेशीर ठरू शकतं.
थंडीमुळे तहान कमी लागते. म्हणून शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. नारळ पाणी ही कमतरता नैसर्गिकरित्या भरून काढतं.
नारळ पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असतात. हे घटक थकवा दूर करतात.
नारळ पाण्यातील अँटीऑक्सिडंट्स असतात ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.
नारळ पाणी थंड गुणधर्माचं असल्यामुळे खूप सकाळी किंवा रात्री उशिरा पिणं टाळा. वेळ चुकीची असेल तर त्रास होऊ शकतो.
खोकला, दमा किंवा सायनसचा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय नारळ पाणी पिऊ नका.
दुपारच्या वेळेत, ऊन असताना नारळ पाणी पिणं सर्वात उत्तम. यावेळी शरीर ते सहज पचवू शकतं.