पुढारी वृत्तसेवा
या घरगुती उपायांचा दररोज वापर केल्याने टाचा मऊ सॉफ्ट मदत होते. थोडा वेळ आणि योग्य काळजी घेतल्यास तुमच्या टाचा निरोगी आणि सुंदर बनू शकतात.
कोमट पाण्यात मीठ घालून 15 मिनिटे या पाण्यात पाय भिजवा. त्यामुळे मृत त्वचा मऊ होऊन ती हलकेचे ब्रश करुन काढून टाकता येते आणि भेगा देखील कमी होतात.
रात्री झोपण्यापूर्वी टाचांना खोबरेल तेल लावा. मोजे घाला त्यामुळे सकाळी तुमच्या टाचा मऊ झाल्याचे जाणवेल.
तुमच्या टाचांवर थोडेसे मध लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यामुळे नैसर्गिक ओलावा मिळून टाचेची त्वचा सॉफ्ट होते
लिंबाचा रस देखील टाचांना लावू शकातात त्यामुळे टाचेची कडक त्वचा मऊ होते.
रात्री झोपताना ॲलोवेरा जेल लावा आणि मोजे घाला. त्यामुळे तुमच्या टाचेची त्वचा दुरुस्त होण्यास मदत होते आणि टाचेचा कोरडेपणा कमी होतो.
तुमच्या टाचांवर क्रीम लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि टाचेची त्वचा मऊ होते.
दुधात बेसन मिसळून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट टाचांवर लावा. पेस्ट सुकल्यानंतर घासून धुवा, त्यामुळे टाचेची त्वचा स्वच्छ होईल आणि त्यानंतर क्रीम लावा.
मोहरीचे तेल काेमट गरम करुन घ्या आणि या तेलाने टाचांवर मालिश करा. त्यामुळे रक्ताभिसरण वाढून भेगा भरण्यास मदत होते.
ग्लिसरीन आणि गुलाबजल मिसळून दररोज रात्री टाचांवर लावा. त्यामुळे टाच बराच काळ मऊ राहण्यास मदत होते