पुढारी वृत्तसेवा
त्वचेला नैसर्गिक ग्लो देतं
नारळ तेल त्वचेला खोलवर पोषण देतं, त्यामुळे चेहरा नैसर्गिकरीत्या उजळ आणि तजेलदार दिसतो.
कोरडी त्वचा मऊसूत करते
हिवाळ्यात कोरडेपणा, खाज, पांढरे डाग पडत असतील तर नारळ तेल उत्तम मॉइश्चरायझर ठरतं.
सुरकुत्या कमी करण्यास मदत
नारळ तेलातील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेचं वृद्धत्व हळू करतात आणि फाईन लाईन्स कमी होण्यास मदत करतात.
पिंपल्स व जळजळ शांत करते
नारळ तेलात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे त्वचेची सूज व जळजळ कमी होते.
त्वचेला आतून मजबूत बनवतं
हे तेल त्वचेच्या पेशींना बळकट करतं आणि स्किन बॅरियर सुधारतं.
डोळ्याखालची कोरडेपणा कमी होतो
रात्री झोपण्यापूर्वी थोडंसं नारळ तेल लावल्यास डोळ्याखालची त्वचा मऊ राहते.
आयुर्वेदानुसार शीतल प्रभाव
आयुर्वेदात नारळ तेल शीतल, पोषक आणि त्वचेसाठी संतुलन राखणारं मानलं जातं.
योग्य वेळ – रात्री वापर सर्वोत्तम
रात्री चेहरा स्वच्छ धुवून हलक्या हाताने नारळ तेलाची मसाज केल्यास सकाळी चेहरा खुललेला दिसतो.
कोणत्या त्वचेसाठी योग्य?
कोरडी व नॉर्मल त्वचेसाठी उत्तम. तेलकट व अॅक्ने-प्रोन त्वचेसाठी मर्यादित वापर करावा.