Eco-Friendly Dhoop: थांबा! नारळाच्या शेंड्या फेकून देताय? घरच्या घरी बनवा इको-फ्रेंडली धूपकांडी

पुढारी वृत्तसेवा

शेंड्यांपासून सहज, सुगंधित, इको-फ्रेंडली धूपबत्ती बनवता येते.

नारळाच्या शेंड्या, भीमसेनी कापूर३ चमच बारीक कुटलेला, गुग्गुळ २ चमचे पावडर

वाळलेली तुळशीची पाने किंवा तेजपत्ता १ चमचा पावडर, साजूक तूप/मध २ चमचे, गुलाबपाणी

कृती - वाळलेल्या नारळाच्या शेंड्या मिक्सरमध्ये वाटून घेऊन चाळणीने चाळून घ्या

एका भांड्यात ही पावडर, भीमसेनी कापूर, गुग्गुळ पावडर, तुळस पावडर एकत्र करा.

या मिश्रणात १ चमचा तूप/ मध घालून थोडे-थोडे गुलाबपाणी टाकत घट्ट पिठासारखे मळा

या पिठाचे हाताने छोटे Cones किंवा लांबट कांड्या बनवून घ्या

तयार केलेल्या धूपबत्ती २ ते ३ दिवस कडक उन्हात पूर्णपणे वाळवून घ्या.

धूप आतून पूर्ण सुकणे गरजेचे आहे. अधिक चांगल्या सुगंधासाठी चंदन पावडर घालू शकता.

How to made Herbal Shampoo at home - घरच्या घरी केसांसाठी उत्तम हर्बल शॅम्पू कसा तयार करायचा? केसगळती होईल कमी!