Clipnosis: मांजराची मान चिमटीत पकडल्यावर ते शांत का होते?

Namdev Gharal

आपण पाहतो की मांजराच्या मानेच्या पाठीमागे चिमटीत धरल्यावर मांजर अचानक शांत होते. यापाठीमागे एक वैज्ञानिक कारण आहे, तसेच निसर्गाचे वरदानही

मांजराप्रमाणेच मार्जारकुळातील सर्वच प्राण्यांमध्ये वाघ, सिंह, बिबट, चित्ते यासह काही इतर प्राण्यांमध्येही असा प्रकार आढळून येतो

याला एक संज्ञा आहे क्लिपोसिस Cliposis म्हणजे मानेवर एखाद्या क्लिपसारखे पकडणे, यामुळे या प्राण्यांच्या डॉर्सल सर्व्हिकल रिजनला dorsal cervical region पकडले जाते.

यामुळे त्‍यांच्यातील नर्व्ह उत्तेजित होतात परिणामी हे प्राणी शांत होतात किंवा काही काळासाठी बेशुद्धावस्थेत जातात. याला scruff reflex असे म्हणतात.

पण ही त्‍यांच्यातीत जन्मताच असलेले जीव रक्षा प्रणाली आहे. यामुळे त्‍यांच्यातील खास तऱ्हेची सेन्सरी नर्व्ह ॲक्टिवेट होतात व मदर रिस्पॉन्स ॲक्टीव्हेट होतात

scruff reflex मुळे हृदयाची गती कमी होते, शेपूट, पाय आखडतात व तो प्राणी एकदम शांत होतो.

निसर्गाने प्राण्यांना दिलेले हे वरदान आहे. कारण कोणताही धोका दिसला की त्‍यांची आई त्‍यांना तत्‍काळ सुरक्षितस्थळी नेऊ शकते. तेही तोंडात मान धरुन

अनेक प्राण्यांचे दात तिक्ष्ण असतात. पण क्लिपोसिस च्या नर्व्ह प्रणालीमुळे ते त्‍यांच्या पिलांना कोणती इजा पोहचवत नाहीत. जरी ते मानेत रुतले तरी त्‍यापासून वेदना होत नाहीत.

मांजरीला इंजेक्शन द्यायचं असतं किंवा नखं कापायची असतात तेव्हा प्राण्यांचे डॉक्टर किंवा संशोधक काही वेळा clipnosis वापरतात

पिले मोठी होत जातील तसे मानेवरील ही सिस्टीम कमी होत जाते. किंवा scruff reflex कमी होतो.

Lamprey Fish | रक्त पिणारा व्हॅम्पायर मासा!