Namdev Gharal
समुद्राच्या खोल पाण्यात अनेक रहस्य दडलेली आहेत. यापैकीच एक आहे लॅम्परे फिश याला Vampire Fish असेही म्हणतात
हे मासे दुसऱ्या माशांचे रक्त पिऊन जगत असतात यासाठी यांच्याकडे विषेश आकाराचे जबडे असतात
याचे तोंड गोल आणि चकतीसारखे (sucker-like) असते. त्या चकतीभोवती तीक्ष्ण, दातांच्या अनेक रांगा असतात.
मध्यभागी जिभेसारखी रचना (rasping tongue) असते, जी टणक असते. त्यामुळे एखाद्या माशाचे रक्त पिणे शक्य होते.
तो एखाद्या माशाच्या शरीराला जळूसारखा घट्ट चिकटतो. आपल्या तीक्ष्ण दातांनी त्या माशाच्या त्वचेवर भोक पाडतो. मग जिभेने रक्त बाहेर काढतो
हे रक्त शोषत असताना लॅम्प्रेच्या लाळेत असलेले anticoagulant नामक रसायन रक्त गोठू देत नाही.
या माशांमध्ये Sea Lamprey (Petromyzon marinus) ही सर्वात प्रसिद्ध रक्त शोषणारी प्रजाती आहे.
हा खरा हाडांचा मासा (bony fish) नाही; तर हा jawless fish म्हणजेच जबडा नसलेला मासा असतो.
यामधील काही प्रजाती समुद्रात राहतात पण प्रजनन करण्यासाठी नद्यांमध्ये येतात.