वाळवंटातील हे Circular Farming पाहून वाटते ‘परग्रहावरील शेती’

Namdev Gharal

सौदी अरेबिया हा वाळवंटी प्रदेश, तेल खाणींमुळे सुबत्ता आलेला देश या देशातही शेती केली जाते यावर विश्वास बसणे कठीण

सौदी अरेबियात अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी इतर देशांवर अवलंबून रहावे लागते पण त्‍यांनी सर्क्यूलर फार्मिग सुरु केली. ही शेती अवकाशातून पाहिली की परग्रहासारखी भासते

देशातील अन्नधान्यााची गरज भागवण्यासाठी यातूनच येथील सरकारने एक वेगळा प्रयोग राबविण्याचे ठरवले, भूगर्भातील पाण्याचा वापर करुन शेती पिकवण्याचा

याठिकाणी भूगर्भातील पाणीही अगदी मर्यादित आहे. यासाठी अनोखी शक्‍कल लढवण्यात आली गोल आकाराची शेती.

कमी पाण्यात व गोल फिरणाऱ्या सेंट्रल पिव्होट तुषार सिंचन पद्धत (Center Pivot Irrigation System) तुषार सिंचन यंत्रणा राबवूण येथे शेतीचे प्रयोग करण्यात आले.

या पद्धतीत एका विहिरीतून किंवा भूगर्भातून पाणी मोटारीने वर काढले जाते.आणि ते एका लांब पाईपला जोडलेल्या फिरता हात (pivot arm) मधून शेतावर शिंपडले जाते.

या वाळवंटी भागात अवकाशातून पाहिले असतात पूर्ण रुक्ष क्षेत्रात अनेक ठिकाणी असे हिरवे गोल आकार दिसून येतात. जणू कोणी एलिएन्सनी शेती पिकवल्‍यासारखी

प्रत्येक गोल शेताचा व्यास काहीशे मीटर आहे. (५०० मीटर ते १ किमी पर्यंत) त्‍यामुळे अवकाशातून हे परग्रहावरील शेतीसारखा भास करतात.

याठिकाणी गहू, बार्ली, अल्फाल्फा (पशुखाद्यासाठी चारा), मका, खजूर व काही फळझाडे ही काही प्रमुख पिके याठिकाणी घेतली जातात

या पद्धतीमुळे वाळवंटी भागातसुद्धा शेती शक्य झाली. मध्यंतरी काही वर्षे मोठ्या प्रमाणावर गहू व चारा उत्पादनामुळे काही वर्षे सौदीने गव्हाची निर्यातसुद्धा केली होती

भूगर्भातील पाणी मर्यादित असल्यामुळे सौदी अरेबियाने अलीकडच्या काळात ही शेती कमी केली आहे व इतर देशाकडून अन्नधान्य आयात करत आहे.

Mosquito|जगातील ‘हा’ देश आहे सर्वाधिक डास असलेला