Constipation : जुनाट बद्धकोष्ठतेवर आराम मिळवण्यासाठी काय खावे? 'बीडीए'च्‍या नव्‍या गाईडलाईन्‍स

पुढारी वृत्तसेवा

जगभरातील दहापैकी एकापेक्षा अधिक व्यक्तींना बद्धकोष्ठता समस्येचा त्रास होतो. यामुळे रुटीन विस्कळीत होते.

आतापर्यंत जुनाट बद्धकोष्ठतेसाठी केवळ जास्त फायबर (तंतुमय पदार्थ) खाणे किंवा पुरेसे पाणी पिणे असे सर्वसामान्य सल्ले दिले जात होते.

ब्रिटिश डायटेटिक असोसिएशनने (BDA) प्रथमच प्रौढांसाठी पुरावा-आधारित आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत.

'जर्नल ऑफ ह्युमन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स'मध्ये प्रकाशित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ७५ क्लिनिकल चाचण्यांच्या निष्कर्षांचा आधार घेण्यात आला आहे.

पोषण, आहारशास्त्र, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि आतड्यांसंबंधी शरीरक्रिया विज्ञानातील सात तज्ञांचा समावेश असलेल्या 'गाईडलाईन स्टीअरिंग कमिटी'ने हे नियम तयार केले.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सप्लिमेंट्स, अन्न आणि पेयांशी संबंधित ५९ आहारविषयक शिफारसी समाविष्ट आहेत.

किंवी या फळाने पोटदुखी आणि अपूर्ण शौचाची भावना यांसारख्या लक्षणांमध्ये सुधारणा होते. हे फळ इसबगोलपेक्षा अधिक उपयुक्त ठरू शकते.

मॅग्नेशियम आणि सल्फेटने समृद्ध असलेले जास्त खनिजे असलेले पाणी मलप्रवाहांमध्ये वाढ करण्यात कमी खनिजे असलेल्या पाण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरते. 

या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये थेट समावेश नसला तरी, चांगल्या पचनासाठी विविध प्रकारचे आणि संतुलित आहार घ्यावा, असे आहारतज्ञ सांगतात.

Multivitamin Vs Diet | canva photo

जेवताना सावकाश आणि अन्न व्यवस्थित चावून खाण्यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच, पुरेशी झोप घेणे देखील आवश्यक आहे.

बद्धकोष्ठतेची लक्षणे तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्‍यास डॉक्टरांना भेटावे, असे तज्ज्ञ सांगतात.

येथे क्‍लिक करा