Namdev Gharal
हा जगातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे.
हा प्रकल्प हुवाई (Huainan), अनहुई (Anhui) प्रांतात एका जुन्या कोळसा खाणीच्या पाण्याने भरलेल्या जागेवर उभारण्यात आला आहे.
या प्राजेक्टमधून एकाचवेळी ४० मेगावॅट इतकी विज निर्मिती होऊ शकते
याठिकाणी बसवलेले सोलर पॅनेल विषेश असून पाण्यावर तरंगणारे बनवले आहेत तसेच पाण्याची बाष्पीभवन व शेवाळाची वाढ सुद्धा रोखली जाऊ शकते.
हा प्रकल्प कोळसा खाणीच्या जागेचा पुनर्वापर करण्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. खाणकाम बंद पाण्याने भरलेल्या या जागेचा उपयोग आता स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी होणार आहे.
पाण्यावरील थंड तापमानामुळे सौर पॅनेलची कार्यक्षमता वाढते पॅनेल जास्त ऊर्जा निर्माण करू शकतात, कारण पाणी पॅनेलला थंड ठेवण्यास मदत करते.
या प्रकल्पामुळे १५००० हजार घरांसाठी विजपूरवठा होणार आहे. यामुळे चीनच्या स्वच्छ ऊर्जेत मोठ्या प्रमाणात भर पडली.
पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर अवलंबून राहण्याऐवजी सौर ऊर्जा वापरल्याने कार्बन उत्सर्जन कमी होते पर्यावरणाचे संतुलन राखण्यास हातभार लागतो.
चीनचा हा तरंगता सौर प्रकल्प जगभरातील इतर देशांसाठी एक आदर्श बनला आहे. ज्या देशांमध्ये जमिनीची कमतरता आहे असे देशासांठी हा प्रकल्प उपयुक्त ठरु शकतो.
भविष्यातील अशा ऊर्जा स्रोतांवर (Renewable energy sources) लक्ष केंद्रित केल्याने ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होते.