Pig Tower : चिनमधील ही २६ मजली इमारत आहे १२ लाख डुकरांसाठी

Namdev Gharal

चिन्यांच्या अजब देशात गजब गोष्‍टी कायमच होत असतात. आता त्‍यांनी डुक्‍कर पालनासाठी एक अनोखे फार्म उभे केले आहे. जे आहे २६ मजली इमारतीत

जगातील सर्वात जास्‍त डुकरांच्या मांसाचे सेवन चिनमध्ये केले जाते. सरासरी १०० डुकरांमागे ६० एकट्या चिनमध्ये फस्‍त केली जातात.

चीनच्या हुबेई प्रांतातील एझोउ (Ezhou) शहरात हा अनोखा डुक्कर फार्म बांधण्यात आला आहे.

ही इमारत २६ मजली आणि ३५० फूट उंच आहे . ही जगातील सर्वात उंच Pig Farm म्हणून ओळखली जाते.

दरवर्षी येथे १२ लाखांहून अधिक डुक्कर (1.2 million pigs) पाळले जातात. हे केंद्र दररोज ३,५०० पेक्षा जास्त डुक्कर तयार करू शकते.

डुक्‍करांच्या पालनांमध्ये सुलभता यावी यासाठी मोठमोठ्या लिफ्ट उभारल्‍या आहेत ज्‍यामध्ये डुकरे या इमारतीमध्ये वर खाली करत असतात.

डुक्‍कर फार्म म्‍हणजे घाणीचे साम्राज्‍य असे चित्र डोळ्यासमोर येते. पण हे फार्म इतके ऑटोमॅटीक आहे की येथे कोणत्‍याही प्रकारे घाण दिसणार नाही.

आहार, पाणी, तापमान आणि स्वच्छता या सर्व गोष्टींसाठी स्‍वयंचलित ऑटोमेशन वापरले जाते.

रोगांचा प्रसार रोखण्यासाठी विशेष हवेचे फिल्टरेशन आणि निर्जंतुकीकरण व्यवस्थाही या इमारतीमध्ये आहे.

डुक्करांच्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करून वीज निर्मिती केली जाते. म्‍हणजे मांसाबरोबरच इतर फायदेही या फार्ममधून घेतले जातात.

बहुमजली रचनेमुळे शेतीसाठी मोठी जमीन न वापरता डुकरांचे उत्पादन करता येते. हा प्रकल्प स्मार्ट शेती आणि शहरी पशुपालनाचा भविष्यासाठीचा नमुना मानला जातो.

देशातील वाढत्या पोर्क मागणीला पुरवठा करणे व सुरक्षित उत्पादन करणे यासाठी हा प्रकल्‍प चिनसाठी सर्वात महत्‍वाचा आहे.

Cameron Airpark|येथील घरांसमोर कार नाही तर विमाने पार्क आहेत