Cameron Airpark|येथील घरांसमोर कार नाही तर विमाने पार्क आहेत

Namdev Gharal

अमेरिकेत एक असे ठिकाण आहे की तेथील लोकांसमोर कार नाही तर चक्‍क विमाने पार्क केलेली दिसतील. ही विमाने छोटी असतात.

तर येथील रस्‍ते म्‍हणजे रन-वे आहेत. कारण रहिवाशांना या रस्‍त्‍यांवरून विमान उडवणे सोपे जाईल

Cameron airpark कॅमेरॉन एअरपार्क असे या ठिकाणाचे नाव असून अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील एल डोराडो काउंटीमध्ये वसलेले आहे.

याठिकाणी १२४ घरे असून प्रत्‍येकाच्या दारात विमान उभे असलेले दिसते. येथे कार गॅरेज कमी पण विमानांसाठी हँगर अधिक आहेत

हे गाव १९६३ साली वसवले गेले यापाठिमागे रोचक इतिहास आहे. दुसऱ्या महायुद्धा दरम्‍यान अमेरिकेत अनेक विमानतळे येथे बांधण्यात आली.

नंतर या ठिकाणी वसाहतींसाठी परवानगी देण्यात आली. यातून कॅमरुन एअरपार्क वसले. निवृत्त वैमानिकांना याठिकाणी घरे बांधण्यासाठी जागा देण्यात आली.

वैशिष्‍ठ्य म्‍हणजे येथे राहणारे सर्व नागरिक हे निवृत्त पायलट आहेत. त्‍यामुळे हे स्‍वतःच ही विमाने उडवतात

याठिकाणचे रस्‍तेही असे बांधले आहेत हि छोटी विमाने उडवण्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये. याठिकाणी लेटर बॉक्‍स किंवा साईन बोर्डही उभारलेले नाहीत.

येथील लोक बाजारहाट करण्यासाठी आपली छोटी विमाने घेऊन उड्डाण करतात.

कुत्रा नेहमी जीभ बाहेर का काढतो?