2026 पासून ‘जनरेशन बीटा’ची सुरुवात! नवी पिढी कशी असेल?

Rahul Shelke

नवी पिढी जन्माला येणार

2026 पासून जन्मलेली मुलं ‘जनरेशन बीटा’ म्हणून ओळखली जातील. जनरेशन अल्फा संपून जग एका नव्या युगात प्रवेश करत आहे.

Gen Beta | Pudhari

कोण आहे Gen Beta?

2026 ते 2039 दरम्यान जन्मलेलं प्रत्येक मूल Gen Beta मध्ये येतं. ही पिढी जगाच्या लोकसंख्येच्या 13–16% पर्यंत असण्याचा अंदाज आहे.

Gen Beta | Pudhari

तंत्रज्ञानाच्या जगात वाढणारी पिढी

एआय, रोबोटिक्स आणि व्हर्च्युअल रियालिटी ही त्यांच्या जगण्याची नवी भाषा असेल. ही पहिली पिढी असेल जी जन्मापासूनच पूर्णपणे डिजिटल जगात असेल.

Gen Beta | Pudhari

तज्ज्ञांना मोठी चिंता

तंत्रज्ञानामुळे सर्जनशीलता आणि कौशल्यांवर परिणाम होऊ शकतो. माणसांमधील नातेसंबंध किती बदलतील याबाबत तज्ञ साशंक आहेत.

Gen Beta | Pudhari

नाव Gen Beta का?

Gen Alpha नंतर ग्रीक वर्णमालेतील पुढचे अक्षर म्हणजे Beta. यामुळे नव्या पिढीचं नावही Gen Beta आहे.

Gen Beta | Pudhari

Gen Betaची ओळख

डिजिटल जग आणि वास्तविक जग यामधलं संतुलन साधणं हे त्यांच्या समोर आव्हान आहे.

Gen Beta | Pudhari

पर्यावरणाबद्दल अधिक सजग

हवामान बदल, लोकसंख्या वाढ आणि प्रदूषणाच्या काळात वाढल्याने ही पिढी पर्यावरण सजग असेल.

Gen Beta | Pudhari

मागील पिढ्यांचा थोडक्यात आढावा

1901 ते 2024 या शतकभरात GI जनरेशनपासून Gen Alpha पर्यंत आठ पिढ्या झाल्या. 2026 पासून जग Gen Beta च्या नव्या पिढीला सामोरं जाणार आहे.

Gen Beta | Pudhari

भविष्य कसं असेल?

Gen Beta प्रगत तंत्रज्ञान, डिजिटल समाज आणि नव्या शोधांसह वाढेल. ही पिढी जगण्याचे अनेक नवे नियम तयार करेल.

Gen Beta | Pudhari

डेस्क जॉब करताना ९ तास खुर्चीवर बसत असाल तर सावधान...

Desk Job | Pudhari
येथे क्लिक करा