चिकन लिव्हर की मटण लिव्हर? आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर कोणतं?

पुढारी वृत्तसेवा

चिकन लिव्हर vs मटण लिव्हर

दोन्ही पौष्टिक, पण आरोग्यासाठी कोणता पर्याय अधिक चांगला? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.

Mutton Liver vs Chicken Liver | Pudhari

लिव्हर का खाल्लं जातं?

चिकन आणि मटण लिव्हरमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अनेक नॉन-व्हेज प्रेमी ते आवर्जून खातात.

Mutton Liver vs Chicken Liver | Pudhari

चिकन लिव्हरचे फायदे

चिकन लिव्हरमध्ये आयर्न, सेलेनियम, व्हिटॅमिन A, B12, फोलेट आणि प्रोटीन मुबलक असते.

Mutton Liver vs Chicken Liver | Pudhari

डोळे आणि मेंदूसाठी उपयुक्त

चिकन लिव्हरमधील व्हिटॅमिन A आणि B12 डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात.

Mutton Liver vs Chicken Liver | Pudhari

मधुमेह आणि वजन नियंत्रणात मदत

मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास चिकन लिव्हर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करू शकते.

Mutton Liver vs Chicken Liver | Pudhari

मटण लिव्हरमध्ये काय खास?

मटण लिव्हरमध्ये व्हिटॅमिन A, D, B12, झिंक आणि कॉपर यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात.

Mutton Liver vs Chicken Liver | Pudhari

रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत

अॅनिमियाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी मटण लिव्हर फायदेशीर मानले जाते. हे शरीरातील ऑक्सिजन पुरवठा सुधारते.

Mutton Liver vs Chicken Liver | Pudhari

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

मटण लिव्हरमधील व्हिटॅमिन B12 शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

Mutton Liver vs Chicken Liver | Pudhari

कोणी लिव्हर खाणं टाळावं?

किडनी स्टोन, जास्त कोलेस्टेरॉल, हृदयविकार असलेले रुग्ण आणि गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लिव्हर खाऊ नये.

Mutton Liver vs Chicken Liver | Pudhari

मग आरोग्यासाठी कोणतं उत्तम?

कमी फॅट आणि सहज पचनासाठी चिकन लिव्हर चांगला पर्याय मानला जातो. तर आयर्न आणि काही पोषक घटकांसाठी मटण लिव्हर फायदेशीर ठरू शकते. मात्र दोन्ही पदार्थ मर्यादित प्रमाणातच खाणे योग्य.

Mutton Liver vs Chicken Liver | Pudhari

चिकन लिव्हर की मटण लिव्हर?

तुमच्या आरोग्याच्या गरजेनुसार निवडा योग्य पर्याय

Mutton Liver vs Chicken Liver | Pudhari

Rahul Gandhi Education: राहुल गांधींकडे किती पदव्या आहेत?

Rahul Gandhi | Pudhari
येथे क्लिक करा