World Best Omelette Recipe: जगातील सर्वोत्तम ऑमलेटची रणवीर ब्रार यांनी सांगितली रेसिपी

Anirudha Sankpal

आवश्यक साहित्य

ऑमलेट बनवण्यासाठी दोन अंडी, दोन चमचे फ्रेश क्रीम, एक चमचा विरघळलेले बटर आणि अर्धा चमचा क्रीम चीज घ्यावे.

मिश्रण तयार करणे

एका भांड्यात अंडी फोडून त्यात फ्रेश क्रीम, विरघळलेले बटर आणि क्रीम चीज एकत्र करावे.

चांगले फेटणे

हे सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर ते चांगले फेटून (beat) एकजीव करून घ्यावे.

मंद आचेवर पॅन गरम करणे

गॅसवर तवा ठेवून गॅस अगदी मंद ठेवावा आणि त्यावर बटर टाकावे.

मिश्रण तव्यावर सोडणे

तयार केलेले अंड्याचे मिश्रण तव्यावर हळूहळू आणि अलगद सोडावे.

बाजू पलटवणे

मिश्रण हलके शिजल्यानंतर त्याची बाजू काळजीपूर्वक उलटवून घ्यावी.

पूर्णपणे न शिजवणे

ऑमलेट कधीही अतिशय कडक किंवा पूर्णपणे (well done) शिजवू नये, ते मऊ असावे.

गरम वाफेवर शेकणे

पॅनवर ८० टक्के शिजवल्यानंतर गॅस बंद करावा, जेणेकरून उरलेल्या उष्णतेत ते परिपूर्ण शिजेल.

येथे क्लिक करा