Health Mistakes | लिपस्टीक, उशी, टॉयलेट आरोग्याबाबत 'या' छोट्या चुका पडतील महाग; 'या' सवयी आजच बदला

पुढारी वृत्तसेवा

उजेडात झोपल्यामुळे शरीरातील 'मेलॅटोनिन' या झोपेच्या संप्रेरकाची निर्मिती कमी होते, ज्यामुळे गाढ झोप लागत नाही. अंधाऱ्या खोलीत झोपल्याने पूर्ण विश्रांती मिळते

उशीच्या कव्हरवर मृत त्वचा, घाम आणि जंतू जमा होतात, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे आणि त्वचेचे आजार होऊ शकतात. आठवड्यातून किमान दोनदा उशीचे कव्हर बदला

70879cb2-6806-4b44-8465-93c45113bbf3

शौचाला जाताना मोबाईल सोबत नेल्यास हवेतील हानिकारक जंतू आणि बॅक्टेरिया फोनच्या पृष्ठभागावर सहज चिकटतात. त्यामुळे गंभीर आजार पसरवू शकतात

सतत इअरफोन्स वापरल्यामुळे कानातील हवेचा प्रवाह खंडित होतो आणि ओलावा वाढून बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते

वारंवार सॅनिटायझर वापरल्याने हातावरील चांगल्या जिवाणूंचा नाश होऊन त्वचा कोरडी व निर्जीव बनते. साबणाने हात धुणे जंतू नष्ट करण्यासाठी प्रभावी ठरते

ओठांच्या माध्यमातून सर्दी, खोकला, हर्पिस आणि इतर व्हायरल संसर्ग अत्यंत वेगाने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात. त्यामुळे लिपस्टीकसह सौंदर्य प्रसाधनांची देवाणघेवाण टाळावी

कृत्रिम एयर फ्रेशनरमध्ये असणारी रसायने हवेत मिसळल्यामुळे श्वासोच्छवासाचे आजार बळावतात. त्यामुळे खिडक्या उघडून ताजी हवा खेळती ठेवणे अधिक आरोग्यदायी ठरते

नाक सतत बंद राहणे हे सायनस, सर्दी, नॅजल पॉलप किंवा ॲलर्जीचे प्राथमिक लक्षण असू शकते. वेळेवर उपचार न केल्यास हा त्रास क्रॉनिक संसर्गात बदलू शकतो

आरोग्याचे रक्षण करण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या वापरा किंवा प्लॅस्टिकची बाटली वापरायचीच झाल्यास ती नियमितपणे पूर्णपणे स्वच्छ करा

येथे क्लिक करा