Charoli Health Benefits : शोभा वाढवणारी 'चारोळी'चे 9 आरोग्यदायी गुणधर्म

पुढारी वृत्तसेवा

मिठाईसह विविध पक्वान्नांची चव व स्वाद वाढवण्यासाठी चारोळीचा आवर्जून वापर केला जातो.

चारोळीच्या झाडाची पाने मोठी आणि बकरीच्या कानासारखी असतात, म्हणूनच याला 'अजकर्ण' असेही म्हणतात.

चारोळीच्या झाडाचे खोड कठीण व खडबडीत असते, तर याची पाने मोठी असल्याने त्यांचा उपयोग पत्रावळ्या बनवण्यासाठी होतो.

चारोळीच्या झाडाला लहान जांभळ्या रंगाची फळे येतात, ज्यांच्या आत तुरीच्या दाण्याएवढा लाल रंगाचा दाणा म्हणजेच 'चारोळी' असते.

चारोळीपासून काढलेले तेल बदामाच्या तेलाप्रमाणे थंड असते. अत्यंत महाग असल्यामुळे याचा खास वापर केला जातो.

स्वादाने मधुर, स्निग्ध आणि पचण्यास जड असली तरी चारोळी शरीरातील वात, पित्त, दाह, ताप आणि कफ दूर करण्यास मदत करते.

चारोळी पित्त आणि वायुहारक असून हृदयाच्या आरोग्यासाठीही उपयुक्त मानली जाते.

चारोळीचे मूळ लोहविकार, कफ व पित्तनाशक असते, तर तिचे तेल पित्त आणि वातशामक म्हणून काम करते.

चारोळी दुधात वाटून चोळल्यास शीतपित्त दूर होते.

येथे क्‍लिक करा.