Chandrapur Tiger Attack | चंद्रपुरात वाघाची 'डरकाळी' शेतकर्यांच्या जीवावर उठली!
पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या अर्धेअधिक वाघ एकट्या चंद्रपूरातील जंगलात आहेत.
चंद्रपूरातील जंगलातील वाघांची शेतशिवार, गावालगत भ्रंमती सुरू असते.
वाघ आणि मानव संघर्ष सूरुच असून, मागील तीन वर्षांत वाघाने ९० जणांचा बळी घेतला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये 95, ब्रम्हपुरी वनविभाग 66, चंद्रपूर 52, मध्य चांदा 36 असे 249 वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात आहेत.
दिवसाआड वाघांच्या हल्यात शेतकऱ्यांचा बळी जात असल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
वाघाच्या हल्यात कुटूंबातील कर्त्यांचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागासमोर आक्रोश करताना कुटुंबीय.
ताडोबामध्ये वनविभागाने 2021 पासून 35 वाघ जेरबंद करण्यातआले आहेत.
शेतशिवारात वाघांचा धोका निर्माण झाल्याने गस्त घालताना वन विभागाचे अधिकारी.
मागील एका वर्षामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 32 नागरिक वाघाच्या हल्ल्यात बळी पडले आहेत.
येथे क्लिक करा.