पुढारी वृत्तसेवा
अनुवंशिकता, हार्मोनल बदल, ताणतणाव, पोषणाची कमतरता यामुळे टक्कल पडते.
एरंडेल तेलात Ricinoleic Acid, व्हिटॅमिन E आणि ओमेगा-9 फॅटी अॅसिड्स असतात.
हे तेल स्काल्पला मॉइश्चर देऊन केसांच्या मुळांना मजबूत करते.
वैज्ञानिकदृष्ट्या टक्कलावर नवीन केस येतात असे ठोस पुरावे नाहीत.
नियमित वापराने केस गळणे काही प्रमाणात कमी होऊ शकते.
डँड्रफ, कोरडेपणा कमी करून स्काल्प निरोगी ठेवते.
जिथे केसांची मुळंच नाहीत, तिथे तेल लावून केस येत नाहीत.
नारळ किंवा बदाम तेलात थोडं एरंडेल तेल मिसळून मसाज करावा.
जास्त केसगळती किंवा टक्कल वाढत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.