Carrot Gulabjam : 'गाजर गुलाबजाम' खाल्लयं का? घरगुती मिठाईची सोपी रेसिपी

अंजली राऊत

गाजर गुलाबजामुन

गाजरातील व्हिटॅमिन्स, मावा आणि सुगंधी वेलचीमुळे ही घरगुती मिठाई स्वादिष्टतेसोबत अधिक पौष्टिकही आहे. सण-उत्सव-समारंभ, पाहुणचार किंवा मुलांना काही खास देण्यासाठी ही रेसिपी नक्कीच करून पहा.

लागणारे साहित्य

गाजर - 2 कप (उकडून कुस्करलेले किंवा किसलेले), खवा / मावा - 1 कप मैदा - 2 ते 3 टेबलस्पून, साखर - 1 कप, पाणी - 1 कप, वेलची पावडर - अर्धा टीस्पून, तूप किंवा तेल - तळण्यासाठी, पिस्ता, बदाम - सजावटीसाठी

चाशनी तयार करा

चाशनी तयार करण्यासाठी कढईत साखर आणि पाणी घालून गॅसवर ठेवा. उकळी आल्यावर एक तारी पाक तयार होईपर्यंत शिजवा. त्यात थोडीशी वेलची पावडर घाला आणि पाक बाजूला ठेवा.

खव्याचे मिश्रण टाका

त्यानंतर गाजर-खव्याचे मिश्रण शिजवा. त्यासाठी उकडून किसलेले गाजर कढईत 2-3 मिनिटे हलकेसे परतून घ्या. आता त्यात मावा घाला आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत चांगले शिजवा. नंतर गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्या.

मऊसर गोळा करा

मिश्रण थंड झाल्यावर त्यात मैदा घालून एकसारखा, मऊसर गोळा मळून घ्या. या मिश्रणाचे छोटे-छोटे गोल गुलाबजामुनचे गोळे तयार करा.

तळून घ्या

कढईत तूप किंवा तेल गरम करा. मंद आचेवर हे गोळे सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. तळताना आच कमी ठेवा म्हणजे जामुन छान फुलतात आणि आतूनही मऊ होतात.

पाकात भिजवा

त्यानंतर तळलेले गुलाबजाम पाकात भिजवा. गरमागरम जामुन तयार पाकात 15-20 मिनिटे भिजवत ठेवा. त्यामुळे पाक छान आतपर्यंत जातो आणि गुलाबजाम मऊ, रसाळदार होतात.

Garnishing करा

वरून चिरलेले पिस्ते, बदाम घालून सजवा. गरम किंवा हलके थंड झालेले गाजर गुलाबजामुन सर्व्ह करा.

गाजर गुलाबजामचे फायदे

गाजरामुळे मिठाईत नैसर्गिक गोडवा वाढतो. तुपात तळले तरी मावा आणि गाजरामुळे ते तुलनेने हलके लागतात. मुलांनाही हा हेल्दी ट्विस्ट असलेला मिठाई प्रकार नक्कीच आवडेल. घरगुती मिळाईला वेगळा पर्याय नक्कीच करा.

Millet Laddu : हिवाळ्यात थंडीपासून वाचायचे असेल, तर खा बाजरीचे लाडू
Millet Laddu : हिवाळ्यात थंडीपासून वाचायचे असेल, तर खा बाजरीचे लाडू