पुढारी वृत्तसेवा
कीटक, कोळी आणि अगदी लहान प्राण्यांना पचवून कीटक 'मांसाहारी' वनस्पती आपली अन्नाची गरज पूर्ण करतात.
सुंदर पण जीवघेणी! "दिसायला अतिशय मोहक आणि शांत, पण शिकार करण्यात तितकीच माहिर असतात.
या वनस्पती फुलासारख दिसतात; पण त्याचे प्रत्येक पान एका शिकारी जाळ्यासारखे काम करते. जाणून घेवूया अशा निवडक वनस्पतींविषयी...
व्हीनस फ्लायट्रॅपची पाने भक्ष्य दिसताच पापणी लवण्याच्या आत बंद होतात! उत्तर अमेरिकेत आढळणारी ही वनस्पती पानांचा पिंजरा करून कीटकांना कैद करते.
घड्यासारखा आकारासारख्या पिचर प्लांटकडे कीटक सुवासाने आकर्षित होतात आणि एकदा का आत पडले की पचून जातात. ही वनस्पती लहान पक्ष्यांनाही फस्त करते.
सनड्यूच्या पानांवर दिसणारे दवबिंदू नव्हे, तर तो डिंकासारखा चिकट सापळा आहे! एकदा कीटक याला चिकटला की सुटका होणे अशक्य.
वॉटरव्हील प्लांटची केवळ जमिनीवरच नाही, तर पाण्याखालीही शिकारी सुरू असते! ही छोटी जलीय वनस्पती पाण्यातील सूक्ष्म जीवांना चक्राकार सापळ्यात वेगाने ओढून घेते.
कोब्रा लिली ही हुबेहूब फणा काढलेल्या नागराजासारखी दिसणारी वनस्पती कीटकांना फसवण्यासाठी यात खोटे मार्ग असतात. एकदा कीटक आत गेला की फसतोच.