Anirudha Sankpal
भारतीय घरांमध्ये जेवणानंतर वेलदोडे तोंडात टाकण्याची सवय अनेकांना असते.
अनेक लोकं मुखवास म्हणून किंवा सवयीचा भाग म्हणून असं करतात.
मात्र जेवणानंतर तोंडात वेलदोडे टाकण्याचे अनेक फायदे आहेत.
वेलदोड्यात अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरिरातील टॉक्सिन्स कमी होण्यास मदत होते.
वेलदोडा हा किडनी आणि लीव्हरला चांगला सपोर्ट करते.
वेलदोड्यातील सिनियोल आणि इतर घटक हे शरिरातील डायजेशन एन्झाईम्स अॅक्टिव्ह करतात. त्यामुळं जेवण लवकर आणि सहज पचते.
वेलदोडा हा नैसर्गिकरित्या एक माऊथ फ्रेशनर आहे. त्यामुळं ताजेतवाने वाटते. तसंच तोंडातील बॅक्टेरिया देखील कमी होतात.
याचबरोबर लाळ चांगल्या प्रमाणात तयार होते. त्यामुळं मुखशुद्धी होते.
जर तुम्हाला जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होत असेल अन् तुम्ही त्यावेळी वेलदोडा खाल्ला तर गोड खाण्याची तुमची तीव्र इच्छा कमी होते.
वेलदोडा हा गोडसर असतो. त्यामुळे वेलदोडा खाल्यानं इमोशनल इटिंगवर देखील लगाम लागतो.