टोयोटा फॉर्च्यूनर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. टोयोटाने किमतीत मोठी कपात केली आहे..जीएसटी सुधारणांमुळे कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना थेट फायदा होणार आहे..या घोषणेनंतर, फॉर्च्यूनरच्या किमतीत तब्बल ₹३.४९ लाखांपर्यंतची मोठी कपात करण्यात आली आहे..या कपातीमुळे फॉर्च्यूनर प्रीमियम एसयूव्ही घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे..फॉर्च्यूनरमध्ये २.७-लीटर पेट्रोल आणि २.८-लीटर डिझेल असे दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. दोन्ही इंजिन अत्यंत शक्तिशाली आहेत..सुरक्षेच्या बाबतीतही फॉर्च्यूनर जबरदस्त आहे. यामध्ये ७ एअरबॅग, व्हिकल स्टेबिलिटी कंट्रोल आणि ३६०-डिग्री पार्किंग कॅमेरासारखे फीचर्स दिले आहेत..याशिवाय, कारमध्ये ९-इंचची टचस्क्रीन, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले आणि वायरलेस चार्जिंगची सुविधाही मिळते.सध्या भारतीय बाजारात टोयोटा फॉर्च्यूनरची किंमत ३३.४० लाख रूपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची किंमत ₹५१.४० लाख रूपयांपर्यंत जाते..किमतीत झालेल्या या कपातीमुळे तुमचं फॉर्च्यूनर घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकतं..आली रे आली! मारुती सुझुकी व्हिक्टोरिस SUV; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत