पुढारी वृत्तसेवा
कोणतंही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणं.
रूग्णांमध्ये कॅन्सर पसरत असताना तापाची वारंवारता वाढते.
अत्यंत थकवा येणं, विश्रांती घेऊनही तो न जाणं हे कर्करोग वाढत असल्याचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं
त्वचेच्या कर्करोगाबरोबरच, इतर काही कर्करोगांमुळे त्वचेत बदल होऊ शकतात.
बद्धकोष्ठता, अतिसार किंवा तुमच्या स्टूलचा आकार बराच काळ बदलणं हे कोलन कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
तीळ वाढणं, दुखापत होणं किंवा रक्त येणं ही त्वचेच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.
कर्करोगाच्या सुरुवातीच्या किंवा प्रगत अवस्थेत असामान्य रक्तस्त्राव होऊ शकतो.
शरीराच्या कोणत्याही भागात कडकपणा किंवा गाठ कर्करोग असल्याचं लक्षण असू शकतं.
सतत अपचन किंवा अन्न गिळताना अडचण येणं ही अन्ननलिका, पोट किंवा घशाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.
सततचा खोकला किंवा घशात होणारी खवखव हे देखील कर्करोगाचे लक्षण आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.