अविनाश सुतार
ब्राउन विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र, उत्क्रांती आणि प्राणिज जीवशास्त्र विभागातील जीवशास्त्रज्ञ आणि सहाय्यक प्राध्यापक जेसिका टिंगल यांनी सापाच्या हालचालींचा अभ्यास केला आहे
साप उत्कृष्ट पोहू शकतात, आणि काही तर बिळे खोदण्यातही निष्णात असतात. तर पावसाळी जंगलातील उंच झाडांदरम्यान घसरत (glide) जातात
Sidewinder सारखे वाळवंटी साप झटपट बाजूने वळत फिरत जातात. काही दुर्मिळ साप अक्षरशः चाकासारखे फिरत उतारावरून खाली जातात
साप हालतो तेव्हा त्याची S आकाराची लयबद्ध हालचाल होते. याला जीवशास्त्रज्ञ “लेटरल अनड्युलेशन” म्हणतात
बहुतेक साप ‘कन्सर्टिना’ नावाच्या हालचाली करू शकतात, ज्यात ते आपले शरीर वारंवार आकसतात आणि ताणतात
साप हा कन्सर्टिना तंत्र वापरून अरुंद बिळातून जाऊ शकतात, झाडाच्या खोडावर चढू शकतात किंवा फांदीवरून हळूहळू पुढे जाऊ शकतात
काही साप प्रजाती हलण्यासाठी “रेक्टिलिनिअर” आणि “साइडवाइंडिंग” सारखी वेगळी तंत्रे वापरतात
रेक्टिलिनिअर हालचालीत साप आपला कणा सरळ ठेवतो आणि पोटातील स्नायूंना वापरून सरळ रेषेत हळूहळू पुढे सरकतो. त्याला हे अरुंद जागेतून जाण्यासाठी उपयुक्त ठरते
साइडवाइंडिंगमध्ये साप आपले शरीराचे काही भाग उचलून पुढे टाकतात आणि जवळपास बाजूनेच प्रवास करतात.
साइडवाइंडर रॅटलस्नेक (Crotalus cerastes) आणि पेरिंग्युयचा अॅडर (Bitis peringueyi) हे तंत्र वापरून ताशी १८ मैलांच्या वेगाने हालू शकतात