Amur Falcon | 5 दिवसांत 5, 400 किमीचे अंतर न थांबता पार करणारा पक्षी माहित आहे का?

अविनाश सुतार

अमूर ससाणा या पक्ष्याने अरबी समुद्रावरून अखंड उडान करत 5 दिवस 15 तासांत तब्बल 5, 400 किमीचा प्रवास न थांबता पूर्ण केला

11 नोव्हेंबर रोजी टॅग केल्यानंतर केवळ 76 तासांत त्याने 3,000 किमीचा प्रवास पूर्ण केला होता, मध्य भारत ओलांडून थेट खुल्या समुद्रावर मार्गक्रमण केले

मणिपूरमध्ये वन्यजीव ट्रॅकिंग प्रकल्पाचा भाग म्हणून टॅग केलेल्या तीन अमूर बहिरी ससाण्यांच्या सोमालियापर्यंतच्या महासागरीय स्थलांतर प्रवासाचा अभ्यास करण्यात आला

वन्यजीव संस्थेचे (WII) वैज्ञानिक ‘मणिपूर अमूर फाल्कन ट्रॅकिंग प्रकल्पा’अंतर्गत त्यांच्या हालचालींचे रिअल-टाइम निरीक्षण करत आहेत

तीन पक्ष्यांपैकी अपापंग (प्रौढ नर) आणि अलांग (तरुण मादी) 18 नोव्हेंबर रोजी सोमालियात पोहोचले. तर तिसरा पक्षी अहू (प्रौढ मादी) 19 नोव्हेंबररोजी सकाळी (भारतीय वेळेनुसार) सोमालियात पोहोचला

गेल्या वर्षी WII ने एका पक्ष्याचे ट्रॅकिंग केले होते, तो गिनी आणि सोमालिया येथे थांबून सुमारे तीन महिने राहिला, तेथील थंडी ओसरल्यानंतर सायबेरियात परतला आणि नंतर पुन्हा भारतात आला

या ट्रॅकिंग प्रकल्पाचे प्रमुख WII चे डॉ. सुरेश यांनी सांगितले की, अमूर फाल्कनचे वर्तन आणि सहनशीलता ही उत्क्रांतीच्या जगण्याच्या रणनीतींमध्ये घट्ट रुजलेली आहे

WII च्या संशोधकांच्या मते अमूर फाल्कनसारख्या प्रजाती कठोर हवामानापासून बचाव करण्यासाठी, अधिक समृद्ध खाद्यस्रोत शोधण्यासाठी किंवा योग्य प्रजननस्थळे मिळवण्यासाठी ऋतूनुसार स्थलांतर करतात

ट्रॅकिंगमुळे पक्षी कोणते मार्ग वापरतात, कोणत्या पर्यावरणीय स्थिती त्यांच्या उडानावर परिणाम करतात आणि कोणत्या महत्त्वाच्या थांबा-स्थानांवर ते अवलंबून असतात, हे समजण्यास मदत होते

येथे क्लिक करा