अमेरिकेची लष्करी कारवाई आणि 'पिझ्झा' ऑर्डरचे कनेक्शन? नेमकं काय आहे प्रकरण?
पुढारी वृत्तसेवा
पिझ्झाच्या ऑर्डरचा मागोवा घेवून अमेरिकेच्या लष्करी मोहिमा कधी आणि कुठे सुरू होतील, याचा अंदाज लावला जातोय, जाणून घेवूया हे कनेक्शन...
अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालयास पेंटागॉन असे म्हटलं जाते.
'पेंटागॉन पिझ्झा रिपोर्ट' (PPR) नावाच्या सोशल मीडिया अकाउंट एका अज्ञात सॉफ्टवेअर इंजिनिअरद्वारे चालवले जाते.
PPR अकाउंट आर्लिंग्टनमधील पेंटागॉनच्या लष्करी संकुलाभोवती असलेल्या पिझ्झेरियांच्या गुगल डेटावर लक्ष ठेवते. यावरून त्याचे २ लाखांहून अधिक फॉलोअर्स पेंटागॉनमध्ये काय चालले असावे, याचा अंदाज लावतात.
एखाद्या लष्करी कारवाईपूर्वी पेंटागॉनमधील अधिकारी रात्रभर जागून काम करतात त्यामुळे त्यांची कार्यालये पिझ्झाच्या बॉक्सने भरतात, असा हा अंदाज आहे.
१२ जून २०२५ रोजी सायंकाळी PPR ने म्हटलं की, पेंटागॉनजवळील पिझ्झेरियांमध्ये मोठी वर्दळ होती; एका तासानंतर इस्रायलने इराणच्या अणु तळांवर हल्ला केला.
२१ जून रोजी संध्याकाळी ७:१३ वाजता, PPR ने निदर्शनास आणले की, पेंटागॉनच्या सर्वात जवळच्या 'पापा जॉन्स'मध्ये मोठी वर्दळ होती. यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या हल्ल्याची घोषणा केली.
PPRशी संबंधित एकाने अमेरिकेतील माध्यम संस्थेशी बोलताना नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, क्रिप्टो ट्रेडर्सना माझ्या रिपोर्ट्समध्ये खूप रस आहे.
पेंटागॉनच्या माजी कर्मचाऱ्यांच्या मते इमारतीच्या आतमध्ये सेल्युलर नेटवर्क खूपच खराब असते, त्यामुळे पिझ्झा ऑर्डर करणेही कठीण आहे.
पिझ्झा ऑर्डर आणि लष्करी कारवाईतील संबंध केवळ मनोरंजक आहे वास्तव नाही, असे पेंटागॉनने स्पष्ट केले आहे.
येथे क्लिक करा...