पुढारी वृत्तसेवा
मध नैसर्गिक असला तरी साखरच आहे
मध नैसर्गिक असला, तरी त्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तो रक्तातील साखर वाढवू शकतो.
मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI)
मधाचा GI साखरेपेक्षा थोडा कमी असतो, पण तो शुगर पेशंटसाठी पूर्णपणे सुरक्षित नाही
शुगर रुग्णांनी मध अमर्याद खाऊ नये
डायबेटीस असलेल्या लोकांनी रोज किंवा जास्त प्रमाणात मध खाणे टाळावे.
काही वेळा मर्यादित प्रमाणात चालू शकतो
डॉक्टरांच्या सल्ल्याने, चिमूटभर किंवा अर्धा चमचा मध कधीमधी घेता येऊ शकतो.
उपाशीपोटी मध घेणे धोकादायक ठरू शकते
रिकाम्या पोटी मध घेतल्यास शुगर लेव्हल झपाट्याने वाढू शकते.
टाइप 1 आणि टाइप 2 डायबेटीससाठी वेगवेगळे नियम
टाइप 1 डायबेटीस रुग्णांनी मध पूर्णतः टाळावा, तर टाइप 2 मध्ये मर्यादित वापर शक्य असतो.
मध औषधाचा पर्याय नाही
मधामुळे शुगर बरी होते, हा सोशल मीडियावरील दावा चुकीचा आहे.
शुगर नियंत्रणासाठी काय खावे?
फायबरयुक्त आहार, कमी GI असलेले पदार्थ, भाज्या आणि डाळी अधिक फायदेशीर ठरतात.
शुगर असलेल्या लोकांनी मध घेण्यापूर्वी डॉक्टर किंवा डायटिशियनचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.