पुढारी वृत्तसेवा
केमिकल ब्लीचऐवजी नैसर्गिक पर्याय का?
लग्नाआधी त्वचा नाजूक असते. केमिकल ब्लीचमुळे जळजळ, पुरळ, रॅशेस होऊ शकतात. त्यामुळे घरगुती नैसर्गिक ब्लीच सुरक्षित ठरते.
बेसन – नैसर्गिक क्लिन्झर
बेसन त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि त्वचा स्वच्छ, उजळ करते.
दूध – त्वचेला नैसर्गिक ग्लो
दुधातील लॅक्टिक अॅसिड त्वचा सॉफ्ट करते आणि नैसर्गिक चमक आणते.
हळद – अँटीसेप्टिक गुणधर्म
हळद त्वचेवरील डाग, टॅन आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करते.
लिंबाचा रस – नैसर्गिक ब्लीचिंग एजंट
लिंबातील व्हिटॅमिन C त्वचा उजळ करण्यास मदत करते (संवेदनशील त्वचेसाठी कमी प्रमाणात वापरावा).
DIY नैसर्गिक ब्लीच कसा बनवावा?
एका वाटीत
2 चमचे बेसन
1 चमचा दूध
चिमूटभर हळद
½ चमचा लिंबाचा रस
सर्व साहित्य एकत्र मिसळा.
वापरण्याची योग्य पद्धत
पेस्ट चेहऱ्यावर लावा, 10–15 मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने हलक्या हाताने धुवा.
किती वेळा वापरावा?
आठवड्यातून 1 ते 2 वेळाच वापरा. लग्नाआधी 7–10 दिवस आधीपासून सुरू करा.
कोणती काळजी घ्यावी?
संवेदनशील त्वचेसाठी आधी पॅच टेस्ट करा. जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवू नका.