Namdev Gharal
जगात सर्वात मोठा साप म्हणजे ग्रीन ॲनाकोंडा याची लांबी ३० फुटापर्यंत असते तर वजन २५० किलोपर्यंत जाऊ शकते
ॲनाकोंडा मासे, काइमन, हरीण, कॅपीबारा, अगदी जग्वार (Jaguars) आणि काहीवेळा मेंढ्यांसारखे मोठे प्राणी आपल्या शरीराने दाबून मारताात व हळू हळू खातात. पण माणसाला मारुन गिळू शकतो का?
तांत्रिकदृष्ट्या हे शक्य आहे. कारण ॲनाकोंडाचा जबडा: खूप लवचिक (flexible) असतो तो मोठे शिकार गिळण्यास सक्षम असतो, तसेच शरीराच्या ताकदीने आकसून श्वास बंद करून तो शिकरीला मारत असतो
मानसाच्या शरीराचा विचार करता माणसाची लांबी 5 ते 6 फूट व सरासरी वजन 50 ते 80 च्या दरम्यान असते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ग्रीन ॲनाकोंडा माणसाला मारु शकतो.
माणसाची रुंदी सरासरी दीड ते पावणेदोन फूटापर्यंत असते यात खांदे सर्वात रूंद असतात. त्यामुळे ग्रीन ॲनाकोंडा माणसाला गिळू शकतो
पण ॲनाकोंडा माणसाची कधीही शिकार करत नाही त्याला अने कारणे आहेत. एकतर ॲनाकोंडाला माहिती असते की माणूस ही त्याचे भक्ष्य नाही
पण माणसाचे खांदे हे रुंद असतात. व हाडांची रचनाही इतर प्राण्यांच्यापेक्षा वेगळी असते त्यामुळे ॲनाकोंडा माणसाची शिकार करतच नाही
तसेच मनूष्य प्राणी ही हाताने चांगला प्रतिकार करु शकतो तसेच मोठ्याने आवाज करतो, सुरक्षेसाठी विविध साधने वापरतो त्यामुळे साप धोका टाळतो
सर्वसाधारण कारण म्हणजे ॲनाकोंडाला धोका वाटला, पळून जाण्याचा मार्ग नसला तर किंवा पकडण्याचा प्रयत्न केला तरच अशा केसेसमध्ये हल्ला करु शकतो
हल्ले झाल्याच्या घटना दुर्मिळ असतात यामध्ये केवळ ॲनाकोंडा पाण्यात जास्त ताकदवान असतो. पोहताना माणसाचे पाय अचानक सापाला लागले तर हल्ला करु शकतो.
त्यामुळे हजारो वर्षाच्या इतिहासात ॲनाकोंडाने माणसाला भक्ष्य म्हणून कधीही निवडलेले नाही. ज्यावेळी असे काही फोटो व्हायरल होतात त्यावेळी ते खोटे किंवा आर्टिफिशयल तयार केलेले असतात.