Natural Rat Control | कापूर - मीठाच्या सोप्या रेसिपीने उंदराना पळवा चुटकीसरशी!

पुढारी वृत्तसेवा

प्रत्‍येक घरात उंदाची समस्या अगदी कॉमन असते. त्‍याच्या कुरतडण्यामुळे महागडी विजेची उपकरणे खराब होऊ शकतात

आता काही सोप्या सहज घरात उपलब्ध होणाऱ्या सोप्या उपायांनी उंदीर घाबरुन पळून जातील

यासाठी किचनमध्ये उपलब्ध असलेले पदार्थ उपयोगात आणायचे आहेत. मीठ, कापूर, व्हिनेगर, डेटॉल किंवा सॅव्हलॉन

यासाठी एका काचेच्या बाटलीत अर्धा कप पाणी घ्या यामध्ये 1 चमचा मिठ, कापराची पावडर करुन 1 किंवा 2 चमचे, व्हिनेगर 2 चमचे, डेटॉलचे 2 टोपण घ्यायचे आहे.

हे सर्व काचेच्या बाटलीत मिसळायचे आहे. व घट्ट झाकण लावून मिश्रण हलवून एकजीव करायचे आहे. झाले तयार तुमचे उंदीर पळवण्याचे औषध

कापसाचे बोळे तयार करा ते या मिश्रणात चांगले बुडवा व आता किचनच्या कोपऱ्यात किंवा जेथून उंदिर प्रवेश करतो अशा ठेवून द्यायचे

काय होते. आपण जे मिश्रण तयार केले आहे त्‍यामध्ये कापूर व ॲन्टीसेफ्टिक लिक्विडचा तीव्र वास असतो. तो मानवासाठी उग्र नसतो पण तो उंदरांना उग्र वाटतो.

उंदाराचे नाक अतिसंवेदनशिल असते अशा वेळी या कापसाच्या बोळ्यांचा वास त्‍याला गेला तर तो या उग्र वासाने पटकन तेथून पळ काढतो.

या सोप्या पद्धतीने व अगदी कमी खर्चात तुम्ही उंदराना पळवून लावू शकता.

Zombie Snake : हा आहे ॲक्टिंग करणारा साप!