Strong Bones: हाडे होतील लोखंडासारखी मजबूत... आहारात दुधाऐवजी या ६ देशी गोष्टींचा करा समावेश

Anirudha Sankpal

तीळ (Sesame Seeds)

१०० ग्रॅम तीळामध्ये ९७५ मिग्रॅ कॅल्शियम असते; यातील मॅग्नेशियम शरीरात कॅल्शियम शोषण्यास मदत करते.

Winter sesame seeds benefits

रागी (Ragi)

१०० ग्रॅम रागीमध्ये ३४४ मिग्रॅ कॅल्शियम असून ती मुले, महिला आणि वृद्धांच्या हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Ragi

राजगीरा (Amaranth)

१०० ग्रॅम राजगिऱ्यात २१५ मिग्रॅ कॅल्शियम असते; हे ग्लूटेन-फ्री धान्य हाडांच्या दुरुस्तीस मदत करते.

शेवग्याची पाने (Moringa Leaves)

१०० ग्रॅम ताज्या पानांमध्ये १८५ मिग्रॅ कॅल्शियम आणि व्हिटॅमिन C असते, जे सूप किंवा भाजीद्वारे खाऊ शकता.

सुके अंजीर (Dry Figs)

१०० ग्रॅम सुक्या अंजीरमध्ये १६२ मिग्रॅ कॅल्शियमसह फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळते.

Dry Fruits : कोणता सुका मेवा कशासाठी लाभदायक? | File photo

राजमा (Kidney Beans)

१०० ग्रॅम कच्च्या राजमामध्ये १४३ मिग्रॅ कॅल्शियम असते; तसेच यात प्रोटीन, मॅग्नेशियम आणि आयर्नही असते.

दूध पिणे अनिवार्य नाही

१०० ग्रॅम दुधात १२५ मिग्रॅ कॅल्शियम असते; त्यामुळे लॅक्टोज इनटॉलरन्स असलेले लोक या पर्यायांचा वापर करू शकतात.

संपूर्ण आरोग्य

मजबूत हाडांसाठी फक्त कॅल्शियमच नाही, तर व्हिटॅमिन D, सूर्यप्रकाश आणि नियमित व्यायामही तितकाच आवश्यक आहे.

canva photo
येथे क्लिक करा