पुढारी वृत्तसेवा
शरीरात कॅल्शिअमची कमतरता झाल्यास अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
कॅल्शिअमच्या अभावामुळे हाडे कमकुवत होऊन 'ऑस्टिओपोरोसिस'सारखे आजार होऊ शकतात.
शरीराला पुरेसे कॅल्शिअम न मिळाल्यास सतत थकवा जाणवतो आणि ऊर्जा कमी होते.
हाता-पायांमध्ये वारंवार गोळे (क्रॅम्प्स) येणे हे कॅल्शिअमच्या कमतरतेचे एक प्रमुख लक्षण आहे.
कॅल्शिअम कमी असल्यास हात, पाय किंवा तोंडाभोवती मुंग्या येणे आणि सुन्नता जाणवते.
नखे वारंवार तुटणे आणि ठिसूळ होणे हे देखील कॅल्शिअमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
दातांशी संबंधित समस्या, दात कमजोर होणे किंवा हिरड्यांमधून रक्त येणे ही लक्षणे दिसतात.
कॅल्शिअमची कमतरता टाळण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ आणि कॅल्शिअमयुक्त आहार घेणे महत्त्वाचे आहे.