Toothpaste & cavities | टुथपेस्ट खरेदी करताय? दातांना किड लागू नये म्हणून 'हा' मुख्य घटक नक्की तपासा !

पुढारी वृत्तसेवा

कॅव्हिटीची समस्या

दातांमध्ये वारंवार किड लागणे किंवा कॅव्हिटी होणे ही आजकाल अतिशय सामान्य समस्या बनली आहे.

सर्वात महत्त्वाचा घटक

पण तुम्हाला माहीत आहे का? टुथपेस्ट खरेदी करताना त्यात 'फ्लोराईड' (Fluoride) असणे अत्यंत आवश्यक आहे.

फ्लोराईडचे काम काय?

फ्लोराईड हा असा खनिज घटक आहे, जो दातांचे बाह्य कवच (Enamel) मजबूत करण्याचे काम करतो.

बॅक्टेरियापासून संरक्षण

हा घटक दातांवर जमा होणाऱ्या घातक ॲसिड आणि बॅक्टेरियाविरुद्ध लढून किड लागण्यापासून रोखतो.

खरेदी करताना लेबल वाचा

त्यामुळे यापुढे कोणतीही नवीन टुथपेस्ट खरेदी करताना, त्याच्या पॅकिंगवरील घटक (Ingredients) नक्की तपासा.

'फ्लोराईड' युक्त टूथपेस्ट निवडा

पॅकिंगच्या मागे 'Fluoride' किंवा 'Sodium Fluoride' असे लिहिले असेल, तरच ती टुथपेस्ट खरेदी करा.

मुलांसाठी योग्य प्रमाण

लहान मुलांसाठी टुथपेस्ट घेताना फ्लोराईडचे प्रमाण कमी आणि त्यांच्या वयानुसार योग्य असावे, हे लक्षात ठेवा.

आरोग्याची सुरुवात

आजच तुमची टुथपेस्ट चेक करा आणि दातांचे आरोग्य निरोगी ठेवा! माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

येथे क्लिक करा...