पुढारी वृत्तसेवा
घाईत निर्णय घेऊ नका! हे 7 महत्त्वाचे कागदपत्र तपासल्याशिवाय प्लॉट खरेदी करणे धोकादायक ठरू शकते
या कागदावरून जमिनीचा खरा मालक कोण आहे हे समजते. जमीन शेतीची आहे की इतर प्रकारची, याचीही माहिती मिळते
जमिनीचा टॅक्स भरला आहे का? मालकीचा इतिहास आणि सरकारी नोंदी यामध्ये दिसतात
प्लॉट निवासी वापरासाठी मंजूर आहे का हे इथून कळते. NA नसलेली जमीन पुढे अडचणीत येऊ शकते
स्थानिक प्रशासनाने लेआउट मंजूर केला आहे का हे तपासा. अनधिकृत लेआउटमुळे मोठे नुकसान होऊ शकते
प्लॉटला कायदेशीर रस्ता जोडलेला आहे का हे नक्की पाहा. रस्ता नसलेला प्लॉट भविष्यात डोकेदुखी ठरू शकतो
जमिनीवर कर्ज, कोर्ट केस किंवा वाद नाही ना याची तपासणी करा
जमीन आधी कोणाकडून कोणाला विकली गेली? मालकी हक्क स्पष्ट असणे खूप गरजेचे आहे
कागदपत्र न तपासता प्लॉट घेतल्यास फसवणूक होऊ शकते. गरज पडल्यास वकिलांचा सल्ला घ्या
योग्य पडताळणी करा आणि सुरक्षित गुंतवणूक करा